मुहूर्त ठरला तर मग…. गौतम गंभीर ‘या’ दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार

टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोचचा शोध या महिन्याच्या(Team India) अखेरीस संपू शकतो. कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य कोच होणार हे निश्चित झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय या महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाचा कोच म्हणून गंभीरची अधिकृत घोषणा करेल.

रिपोर्ट्सनुसार, गौमत गंभीरने बीसीसीआयला(Team India) त्याचा सपोर्ट स्टाफ आणण्यास सांगितले आहे. सध्या विक्रम राठोड हे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत, तर पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप द्रविडच्या सपोर्ट स्टाफचा एक भाग आहे. जर गंभीर प्रशिक्षक झाला तर या सगळ्यांची पण सुट्टी होईल.

भारतीय संघाचे विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपणार आहे. बीसीसीआयने काही काळापूर्वी नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. दरम्यान, राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत गौतम गंभीरच्या नावासह अनेक नावे या शर्यतीत सामील होती.

गौतम गंभीर सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. तो मेंटर बनल्यानंतर पहिल्या सत्रातच केकेआरला जेतेपद पटकावण्यात यश आले. यानंतर गंभीर टीम इंडियाचा कोच होणार या बातम्यांनी वेग घेतला. स्वत: गंभीरनेही सांगितले की, त्याच्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा कोणताही मोठा सन्मान नाही. जर त्याला संधी मिळाली तर तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू इच्छितो.

हेही वाचा :

मुलींचं कधीच करु नका असं कौतूक, ब्रेकअप होऊ शकतं

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ची विकेंडमध्ये जोरदार बॅटिंग,

सासूसोबत पूजा आणि मंत्र जाप केल्याचा VIDEO शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल