“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका”
राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. अर्थमंत्री अजित पवार(Yojana) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली. त्यामुळे सध्या महिला वर्ग जाम खुश आहे. राज्यभरात योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. मात्र, या योजनेवर अर्थखात्यानेच आक्षेप घेतला होता, ही बाब आता समोर आली आहे.
या योजनेवरून(Yojana) महायुतीमध्ये वाद सुरू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यावर आधीच भरमसाठ कर्ज असताना या योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटी रुपयांच्या आसपास जाईल, याकडे लक्ष वेधत ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे होते.
आता यावरच प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तसंच योजनेसाठी राज्यपालांचा तब्बल 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. राज्यपालांना 40 एकरचा बंगला कशाला पाहिजे?, हा बंगला विकला तर तब्बल 1 लाख कोटी मिळतील, असं बच्चू कडू म्हणाले.
इतकंच नाहीतर राज्यपालांसाठी असलेल्या बंगल्याची 40 एकरातील जागा विकून येणाऱ्या पैशातून कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करा, अशी मागणी देखील बच्चू यांनी केली आहे. यातून त्यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
राज्यपालांचा एवढा मोठा मुंबईतील 40 एकरचा बंगला विकायला हवा आणि त्यांना दुसरा एखादा चार-पाच मजल्यांचा बंगला बांधून द्यावा. आम्ही ती जागा बघितली आहे. त्या जागेचे देखील चांगले पैसे येतील, असा सल्ला आम्ही दिलाय, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
हेही वाचा :
ओव्हर पझेसिव्ह गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडमुळे वैताग आलाय; ‘या’ टिप्सने सर्व काही सुरळीत होईल
अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार; पीडितेला लॉजमध्ये बोलवायचा अन्…
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक”; संजय राऊतांची टीका