टक्कल पडल्यास 20 रुपयांचा ‘हा’ उपाय करून पहा; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही.(hair loss treatment) कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, यासांरखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवायही असे अनेक व्हिडिओ व्हा.रल होत असतात ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले किंवा एखादी वस्तू वापरण्याचे, जुगाड करण्याची सांगतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे, राहणीमानमुळे अनेक गोष्टींच्या समस्या उद्भवत आहेत. अगदी केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत अनेक आजार होतच आहेत. लोकांच्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होत आहे. अनेकजण केसगळतीच्या त्रासाला कंटाळेले आहेत. तुम्ही देखील केसगळतीच्या त्रासाने त्रस्त असाल. अनेक उपाय केले असतील, घरगुती उपायही केले असतील. मात्र, यामुळे केसगळतीची समस्या दूर झाली नसेल. यासंबंधीच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ काही माणसे डोक्याला टक्कल पडत असल्याने यावर उपचार करण्यासाठी थेट मेरठला पोहोचले आहेत. पण विशेष बाब म्हणजे हा उपचार फक्त 20 रुपयांत करुन(hair loss treatment) मिळत आहे. यामुळे यासाठी तिथे रांगच रांग लागली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल  होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी लोकांची रांगच रांग लागली आहे. यामध्ये अनेक लोकांचा टक्कल पडलेला आहे. तर यामध्ये काही लोक टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्याला काही औषध लावत आहे. एक माणूस हे औषधाची बाटली घेऊन उभा आहे तर दोणजण ते लोकांच्या डोक्याला लावत आहे. माणसांची रांग पाहता तुमच्या लक्षात येईल की, बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या आहे. तसेच अनेकांचा टक्कल पडत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टादग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज देखील मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे. एका युजरने(hair loss treatment) आपल्या एका मित्राला टॅग केले आहे आहे आणि म्हटले आहे की, भाऊ, तू नाही गेलास. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, खरंच आहे का असे काही. आणखी एका युजरने म्हटले उपाय करणाऱ्याला म्हटले आहे की, स्वत:चा टकला आहे अन्… अशा मजेशीर प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे