नाश्त्यात तेलकट, तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पिस्ता शेक

नाश्त्यात नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पिस्ता शेक बनवून खाऊ (food)शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया पिस्ता शेक बनवण्याची रेसिपी.

सकाळच्या नाश्त्यात सर्वच घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात.(food) तर कधी कधी बाहेरून विकत आणलेले पदार्थ नाश्त्यात खाल्ले जातात. मात्र तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पिस्ता शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी पिस्ता अतिशय प्रभावी आहे. कारण कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात ड्रायफ्रूट खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर कायम निरोगी राहते. पिस्ता खाल्यामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पिस्ता शेक बनवण्याची सोपी रेसिपी.

कोकणातील पारंपरिक पदार्थ! दुपारच्या जेवणात झटपट बनवा ‘वालाची आमटी’, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

साहित्य:
पिस्ता
दूध
साखर
वेलची पावडर
बर्फाचे तुकडे
व्हॅनिला आईस्क्रीम
सजावटीसाठी पिस्ता
शाळेचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा गरमागरम देसी बर्गर, नोट करा रेसिपी

कृती:
पिस्ता शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिस्ता सोलून वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात भिजत ठेवा. त्यानंतर अर्धा तासाने पिस्ताची साल काढून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेला पिस्ता, साखर,(food) थंड दूध आणि वेलची पावडर घालून बारीक शेक तयार करून घ्या.
त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
शेक बनवताना त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकल्यास शेक आणखीनच क्रिमी आणि छान लागेल.
सर्व्ह करताना काचेच्या ग्लासात तयार केलेले पिस्ता शेक ओतून वरून पिस्त्याचे बारीक तुकडे टाकून सजावट करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पिस्ता शेक. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

हेही वाचा :