साधा डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा मसूर डाळ डोसा, वाचा सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा हेच पदार्थ बनवले जातात. तसेच इडली,(dosa) डोसा, मेदुवडा इत्यादी पदार्थ प्रत्येक रविवारी बनवले जातात. दक्षिण भारतामध्ये हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

तिथे सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणात सुद्धा(dosa) डोसा, इडली हेच पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून तयार केलेला डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मसूर डाळीचा डोसा बनवू शकता. मसूर डाळ पचनास हलकी असते. शिवाय या डाळीचे सेवन केल्यामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीचा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
मसूर डाळ
मूग डाळ
ओट्स
आलं
हिरवी मिरची
मीठ
तेल
ओवा
बीट
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:
मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मसूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, भिजवून घेतलेले ओट्स, आलं, मिरची, ओवा आणि किसून घेतलेली बीट टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
तयार करून घेतलेली पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करा.
त्यात चवीनुसार मीठ टाकून मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवून घ्या.
डोसा बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवा. त्यावर थोडस तेल टाकून वरून तयार केलेले मिश्रण टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरवा.
दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसूर डोसा.

हेही वाचा :

सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?