ग्लोइंग त्वचेसाठी सतत गुलाबपाणी वापरता मग जाणून घ्या त्वचेचे होणारे गंभीर नुकसान

मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी (glowing skin)गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. गुलाब पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याशिवाय त्वचा उजळ्वण्यासाठी गुलाब पाणी वापरले जाते. कोणताही फेसपॅक किंवा फेसमास्क तयार करताना गुलाब पाण्याचा वापर केला जातो. त्वचा टवटवीत आणि फ्रेश ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. यामुळे त्वचा फ्रेश आणि ताजीतवानी दिसते. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवलेले गुलाब पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. डोळ्यांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो

गुलाब पाणी त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी मदत करते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि चेहरा उजळदार दिसू लागतो. डोळ्यांमध्ये होणारी जळजळ, त्वचेमधील काळेपणा, मुरुमांवरील उपचारासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. पण नेहमी नेहमी गुलाब पाण्याचा वापर केल्यास त्वचा (glowing skin)खराब होण्याची शक्यता असते. त्वचेचे नुकसान होऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊ शकते.
गुलाब पाण्याच्या अतिवापरामुळे त्वचेचे होणारे नुकसान:
त्वचा कोरडी पडणे:
त्वचेसाठी गुलाब पाण्याचा अतिवापर केल्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. गुलाब पाण्याचा अधिक वापर केल्यामुळे त्वचेवरील तेल निघून जाऊन त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होतो.
ऍलर्जी होण्याची शक्यता:
गुलाब पाण्यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. मात्र गुलाब पाण्याचा वापर केल्यामुळे काहींच्या त्वचेवर ऍलर्जी होण्याची शक्यता असते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी गुलाब पाण्याचा वापर करू नये.

मुरूम आणि खुणा:
चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्यानंतर त्वचेची छिद्र (glowing skin) बंद होऊन जातात. ज्यामुळे त्वचेमध्ये साचून राहिलेली घाण त्वचेत तशीच राहते. यामुळे मुरूम किंवा पुरळ येऊ शकतात.त्यामुळे त्वचेसाठी गुलाब पाणी योग्य नाही. गुलाब पाण्याचा अतिवापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊन संतुलन बिघडून जाते.
योग्य प्रमाणात गुलाब पाण्याचा वापर करणे:
त्वचेवर गुलाब पाणी लावताना त्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. अतिप्रमाणात गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते आणि त्वचा कोरडी, निस्तेज दिसू लागते.
हेही वाचा :
‘फक्त दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा’… ; संजय राऊत यांचा घणाघात
रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर: 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट त्यासोबत…
चिकन खाणाऱ्यांनो सावधान! डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती