दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता परीक्षा केंद्रावर…

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत, आणि राज्यभरात (students)विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पेपर फुटी आणि परीक्षा हॉलमधील कॉपीसारख्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे.

या समस्येला रोखण्यासाठी आणि (students)परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत प्रत्येक परीक्षा कक्षात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

राज्यातील एकूण ७००० परीक्षा केंद्रांवर हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यापैकी ५००० केंद्रे दहावीच्या परीक्षांसाठी आणि ३००० केंद्रे बारावीच्या परीक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान १० CCTV कॅमेरे बसवले जातील.

हे कॅमेरे परीक्षा हॉलमधील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर फुटी किंवा कॉपीसारख्या गैरप्रकारांसाठी वाव मिळणार नाही. यामुळे परीक्षेची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

CCTV कॅमेरे बसवण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. एका कॅमेऱ्यासाठी २० ते २२ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. राज्यातील अनेक शाळा आणि शिक्षण संस्था यासाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. त्यांनी शिक्षण मंडळाने या कार्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली आहे.

तसेच काही शाळांनी आर्थिक मदतीशिवाय हा निर्णय अंमलात आणणे कठीण असल्याचेही नमूद केले आहे. हा निर्णय लागू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल प्रामाणिकतेची भावना वाढीस लागेल. पेपर फुटी आणि कॉपीसारख्या घटनांवर अंकुश लावण्यास मदत होईल. शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास पुन्हा दृढ होईल.

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल. शिक्षण क्षेत्रासाठी हा पाऊल एक मोठा बदल घडवून आणेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत करून, परीक्षेसाठी प्रामाणिक तयारी करावी, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची यंदाची बोराडे परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच याचा काळात बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. कॉपी केस तसेच इतर गोष्टी टाळण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारण…

मुख्यमंत्र्यांसोबत आदित्य ठाकरे, पण मुद्दा शिंदेंच्या खात्याचा; चर्चांना उधाण!

आ बैल मुझे मार! स्वतःच मृत्यूला दिले आमंत्रण, सापांच्या घोळक्यात उडी मारताच घडले असे… Video Viral