दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, निकालाच्या तारखेबाबत मोठी अपडेट समोर

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या(students) निकालाची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. यंदा निकाल लवकर लागण्याची शक्यता असून, बोर्डाकडून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 17 मार्च 2025 रोजी पूर्ण झाली. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे(students) आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेआधीच जाहीर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यंदाचा SSC निकाल 15 मेच्या आत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन लवकर सुरू केल्यामुळे निकाल लवकर तयार केला जात आहे. त्यामुळे हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासातील सर्वात लवकर लागलेला निकाल ठरण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर SSC निकालाच्या तारखांबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत असले, तरीही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप अधिकृत दिनांक जाहीर करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 15 मे पूर्वी निकाल जाहीर होईल, असा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

यावेळी परीक्षेच्या कालावधीत कॉपी रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्त मोहिमे’ची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, तरीही काही ठिकाणी गैरप्रकार घडले. राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89 आणि बारावीच्या परीक्षेत 360 कॉपीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. बोर्डाने या प्रकरणांवर कडक कारवाई केली असून निकाल प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला आहे.

निकाल लवकर लागण्यामागील मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना(students) उच्च शिक्षणासाठी वेळेत प्रवेश घेता यावा. त्यामुळे बोर्डाने यंदा परीक्षा लवकर घेतल्या आणि आता निकालही लवकर देण्याचा विचार केला जात आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट्सवर नियमितपणे अपडेट तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा :

अभिनेता आयुष्यमान खुरानावर दु:खाचा डोंगर, पत्नीला 7 वर्षांनंतर पुन्हा…

गर्दीपासून लांब भारतातील ‘या’ थंड हवेच्या ठिकाणी एकदा आवश्य भेट द्या

सेक्स माझी गरज तुला वेदना झाल्यातरी… करोडपती प्रसन्ना शंकरच्या बायकोचा खुलासा

 महिलांच्या या सवयींमुळे नात्यांमध्ये होते गडबड, नारीत दोष असले तरी