HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; ‘या’ तारखेला UPI सेवा राहणार बंद

देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पैसे पाठवणे आणि स्वीकारणे अतिशय सोपे झाले आहे. किराणा दुकानदारांपासून ते भाजी विक्रेत्यांपर्यंत सर्वजण यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. आता जगातील अनेक देशांमध्ये यूपीआय पेमेंटचा वापर केला जात आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी खासगी बँक(Bank), एचडीएफसी बँकेने यूपीआय व्यवहारांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

एचडीएफसी बँकेने(Bank) आपल्या लाखो ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टीम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा 8 फेब्रुवारी 2025 रोजी काही तास बंद राहणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत यूपीआय सेवा बंद राहील. या वेळेत बँकेचे ग्राहक यूपीआयच्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवू शकणार नाहीत.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या डाऊनटाईम कालावधीदरम्यान एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेव्हिंग अकाउंटसोबतच रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

यूपीआय एक अशी सुविधा आहे, जी तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे हस्तांतरित करण्याची संधी देते. यासाठी पेटीएम, फोन पे, भीम, गुगल पे यांसारख्या यूपीआय सपोर्ट करणाऱ्या ॲप्सची गरज असते. या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर, स्कॅनर किंवा यूपीआय आयडीचा वापर करून सहज पैसे पाठवू शकता.

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी 8 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा कोणताही व्यवहार करण्याचे टाळावे. बँकेने दिलेल्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी यूपीआय सेवा सुरळीत सुरू राहील.

हेही वाचा :

‘सनम तेरी कसम’ अभिनेत्री मावरा होकेनने केले लग्न

मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत म्हशीने असे काही केले की… पाहूनच आवाक् व्हाल; Video Viral

‘लाडकी बहीण’साठी सरकारचा मोठा निर्णय; तीन कोटी खर्चून करणार ‘हे’ काम