लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(sisters) योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, लाडकी बहीण(sisters) योजनेसंदर्भातील सर्वसामान्य नागरिक आणि लाभार्थी ज्या घोषणेची प्रतिक्षा करत होते, ती घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. योजनेच्या हप्त्याची रक्कम ₹1,500 वरून ₹2,100 करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

यासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹2,100 च्या हप्त्याविषयी विचारणा करण्यात आली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(sisters) योजनेसाठी निधी कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्याचे नियोजन सरकारने केले असून, काही लाभार्थींनी या योजनेतील मदतीतून सोसायट्या स्थापन केल्या आहेत. पुढील टप्प्यात, या सोसायट्यांचे मोठे जाळे निर्माण करून राज्यस्तरीय ‘अपेक्स’ सोसायटी स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे.

₹2,100 च्या हप्त्यावर निर्णय कधी?
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कोणतीही योजना सुरू करताना आर्थिक गृहितके ठरवली जातात आणि प्रत्यक्ष खर्च वर्षभरानंतर स्पष्ट होतो. मागील वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. हप्त्याची रक्कम वाढवण्याची गरज वाटल्यास, त्याबाबत जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये निर्णय घेतला जाईल.

फडणवीस म्हणाले, “₹2,100 च्या हप्त्यासंदर्भात काम सुरू आहे. मात्र, अर्थसंकल्पीय शिस्तही महत्त्वाची आहे. आपल्याला योजना शाश्वत ठेवायची असेल, तर आर्थिक शिस्त पाळावी लागेल. 3 टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. मागील वर्षी हा दर 2.9% होता, जो 2.7% पर्यंत आणला आहे.”

1500 रुपये एप्रिलमध्ये मिळणार, वाढीव हप्ता लवकरच – एकनाथ शिंदे
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींना ₹1,500 मिळतील. जेव्हा सरकार अधिकृत घोषणा करेल, त्यानंतर ₹2,100 चा हप्ता दिला जाईल.”

2024-25 आर्थिक वर्षात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33,232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले.2025-26 आर्थिक वर्षासाठी, या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विशेष योजना हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपये असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

युजवेंद्र चहलला “गर्ल”फ्रेंडसोबत पाहून धनश्रीची क्रिप्टिक पोस्ट

सुनीता विल्यम्सबाबत मोठी बातमी, ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार

‘लाडक्या कंत्राटदारांनी अर्थसंकल्प गिळला’; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका