महाराष्ट्रासह 31 राज्यांत पुढील 6 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा कोणते जिल्हे आहेत अलर्टवर

महाराष्ट्रासह तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 6(background) दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय. यापार्श्वभूमीवर काही राज्यांना पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलंय.

सध्या गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छवरील खोल दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. येत्या 30 ऑगस्ट रोजी याचे रुपांतर पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळात बदलू शकते. त्यामुळे 30 ते 4 सप्टेंबर या कालावधीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची  शक्यता आहे. ओडिशा, कर्नाटक, केरळ, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर पूर्व-पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्र, गोवा, पूर्व-पश्चिम मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार ही बेटे अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख राज्याला पावसाचा यलो  अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड,(background) दिल्ली, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील 6 दिवस मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे.

मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जळगाव जिल्ह्यात (background)पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

हेही वाचा:

भाजप नेत्या चित्राताई वाघ ‘या’ मराठी मालिकेत झळकणार

नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral

अटलजींचे स्वप्न होणार साकार; ‘INS Arighat’मुळे देश होणार आणखी शक्तिशाली

दिलासादायक! देशात मान्सूनचा मुक्काम वाढला, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणार जोरदार पाऊस

पोलीस आमदारांच्या गाडीची धुतायेत व्हिडिओ व्हायरल, खळबळ उडाली