अवघ्या 5 दिवसांत ‘या’ 5 राशींचा सुरु होणार ‘गोल्डन टाईम’
देवगुरु ग्रह बृहस्पती हा सुख, सौभाग्य, ज्ञान आणि विवाहाचा(golden)कारक आहे. सध्या गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. आणि 31 जुलै 2024 रोजी बृहस्पती नक्षत्र परिवर्तन करुन रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात प्रवेश करणार आहे. तर, 19 ऑगस्ट पर्यंत गुरु ग्रह याच राशीत स्थित असणार आहे. त्यामुळे पाच राशींना याचा चांगला लाभ होणार आहे.
मेष रास
देवगुरु बृहस्पतीचं रोहिणी नक्षत्रात चरण परिवर्तन होणार आहे. हे परिवर्तन(golden) मेष राशींच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. तुमच्या नोकरी-व्यापारात देखील चांगली वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.
वृषभ रास
गुरु ग्रह सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. गुरु ग्रहाच्या स्थितीत परिवर्तन केल्याने वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा सुद्धा प्लॅन बनवू शकता. घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. तसेच, तुमचं एखादं मोठं काम या काळात पूर्ण होईल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे लाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, तुमचं काम पाहून तुमच्या पगारात वाढ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. वैवाहिक जीवन फार सुखी असेल. जोडीदाराचा प्रत्येक कार्यात तुम्हाला पाठिंबा मिळेल.
सिंह रास
गुरुच्या स्थितीतील परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला जर तुमच्या नोकरीत बदल करायचे असतील तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच, तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष दूर करायचे असतील तर त्यासाठी ही शुभ वेळ आहे. या काळात भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यशाली असणार आहे. जर तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. भगवान शंकराच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. फक्त प्रामाणिकपणे कामे करत राहा.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
सांगलीत कृष्णा नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची स्टंटबाजी अंगलट VIDEO
पैशांची चणचण भासते वैवाहिक जीवनात तंटा शास्त्रानुसार हळदीचे उपाय करा
श्रीलंका मालिकेच्या आधी बोर्डाचा मोठा निर्णय, ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं संघाचं नेतृत्व