मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार, Hyundai INSTER EV लॉन्च

आजकाल भारतीय बाजारपेठेत छोट्या इलेक्ट्रिक वाहनांना(hyundai ev) खूप मागणी आहे. हे पाहता ह्युंदाईने नुकतीच नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. कंपनीने आपली नवीन EV Hyundai Inster सादर केली आहे जी कंपनीच्या स्वतःच्या Hyundai Casper वर आधारित आहे. त्याच वेळी, ही कार टाटा पंच EV ला थेट टक्कर देऊ शकेल, जी सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित इलेक्ट्रिक कार मानली जाते. Hyundai Inster EV चे डिझाईन खूपच भविष्यवादी आहे. तथापि, त्याचे बाजूचे दृश्य कॅस्परसारखे आहे.

नवीन INSTER चे डिझाइन अतिशय बोल्ड(hyundai ev) ठेवलं आहे. कंपनीचा दावा आहे की, ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश आणि हाय रेंज ऑफर करणारी इलेक्ट्रिक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. नवीन INSTER ची लांबी 3825mm, रुंदी 1610mm, उंची 1575mm आणि व्हीलबेस 2580mm आहे.

ग्राहकांना या कारमध्ये 10.25 इंच डिजिटल क्लस्टर आणि 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. जयामध्ये नेव्हिगेशन आणि वायरलेस चार्जिंगचा समावेश असेल. ही फाय सीटर कार आहे. यात 280 लीटरची बूट स्पेस असेल.

नवीन INSTER मध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय असेल. याचा स्टँडर्ड 42kWh बॅटरी पॅकसह असेल, जो पूर्ण चार्ज केल्यावर 300 किलोमीटरची रेंज देईल. तर याचा 49kWh बॅटरी पॅक प्रकार 355 किलोमीटरची रेंज ऑफर करेल, असं बोललं जात आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडू शकता.

ही कार 10-80% चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जरने फक्त 30 मिनिटे लागतील. दरम्यान, ही कार भारतात कधी लॉन्च होणार, याची किंमत किती असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

Kalki 2898 AD चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका

राजकीय भूकंप! अजितदादा गटाचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात…

मोठी बातमी! दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; अनेक कार चक्काचूर, पाहा Video