ऐन विधानसभा निवडणुकीत ‘या’ दोन नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ
हिंगणघाट : महाविकास आघाडीने जुन्या नेत्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात आलेले अतुल वांदिले यांना हिंगणघाट विधानसभा(assembly) मतदारसंघात उमेदवारी दिली. अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे अॅड. सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.
मी व अॅड. सुधीर कोठारी आम्ही दोघांनी आमच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला असून, संबंधित राजीनामा ई-मेलद्वारे पक्षश्रेष्ठी शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविला असल्याची माहिती पत्रपरिषदेतून माजी आमदार राजू तिमांडे यांनी दिली. राजू तिमांडे पुढे म्हणाले, हिंगणघाट विधानसभा(assembly) मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला किंवा अॅड. सुधीर कोठारी यांना द्यावी, अशी वेळोवेळी विनंती आम्ही केली. पण उमेदवारी जाहीर करताना त्यावर विचार झाला नाही.
अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हजारो कार्यकर्ते दुखावले गेले आहे. अॅड. कोठारी यांनी सोमवारी त्यांची उमेदवारी मागे घेतली. पण अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी कायम आहे. मला किंवा अॅड. कोठारी यांना हिंगणघाट मतदारसंघातून उमेदवारी दिली असती तर शंभर टक्के विजय मिळाला असता, असा दावा यावेळी राजू तिमांडे यांनी केला. पत्रपरिषदेला अॅड. सुधी4-45र कोठारी, उत्तम भोयर, राजेश थोरात, आफताफ खान उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रतीक्षा न बघता अनेक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यात आघाडी घेतली असून, अपक्षांना मात्र चिन्हाची प्रतीक्षा आहे. उमेदवारांनी तूर्तास घरोघरी भेट देण्यावर भर दिला आहे. 5 नोव्हेंबर अर्थात आजपासून प्रचारसभा रंग भरणार आहे.
30 नोव्हेंबरला अर्ज छानणीनंतर राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चिंत झाले. त्यांनी जोरकसपणे प्रचार सुरू केला. पक्षाने उमेदवारी घोषित केली तेव्हापासूनच काही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला होता. त्याला आता वेग आला आहे.
हेही वाचा :
झेंडूना चढला भाव! दिवाळीनिमित्त मार्केटयार्डातील फुलबाजार सजला
काँग्रेसला डबल झटका, आधी रवी राजा, मग विद्यमान आमदारानेही पक्ष सोडला, शिवसेनेत जाहीर प्रवेश
धोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर ‘या’ नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा