“काळ्या दाण्यांनी वाढवा लवचिकपणा आणि नियंत्रणात ठेवा कोलेस्ट्रॉल”

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो . खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये (seeds)होणारे, सतत जंक फूड खाणे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्त्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आणि इतर वेळी आहारात बदल करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सांधे दुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. अशावेलु आहारात काळ्या तिळाचे सेवन करावे. काळे तीळ हा पदार्थ अतिशय उष्ण आणि पदार्थ आहे.

यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी णज घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. काळे तीळ शरीराला आवश्यक पोषण तत्वे पुरवण्यासाठी मदत होतेकाळे तीळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा तिळाचे सेवन केल्यास शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. काळ्या तिळाचे सेवन केल्यामुळे संधिवात, सांध्यांमधील वेदना इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय मकर संक्रांतीच्या सणाला तीळ (seeds)आणि गूळ खाण्याची परंपरा आहे, कारण यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. जाणून घ्या काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.

काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

हाडे आणि दात मजबूत होतात:

शरीरात निर्माण झालेली विटामिन आणि इतर पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांचे दुखणे वाढू लागते. त्यामुळे हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात काळे तीळ खावेत. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी पदार्थ हाडांमधील घनता वाढवतात आणि हाडं लवचिक होतात. हाडांचे ठिसूळ होणे, सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिस इत्यादी गंभीर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित काळे तीळ खावेत. काळ्या तिळाचे सेवन केल्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांचे दुखणे कमी होते.

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर काळ्या तिळाचे आईवां करावे. यामध्ये फायबर आणि नैसर्गिक तेल असते, ज्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास (seeds)मदत होते. अपचन, गॅस आणि पोटातील जळजळ इत्यादी समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काळे तीळ. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे.

त्वचेसाठी प्रभावी:

थंडीचे दिवस सुरु झाल्यानंतर त्वचेची गुणवत्ता अधिकच खराब होऊन जाते. अशावेळी आहारात काळ्या तिळाचे सेवन करावे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणावर आढळून येते. चेहऱ्यावर आलेले मुरूम, पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे. काळे तीळ त्वचेची चमक वाढवण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्याआधी नियमित तिळाच्या तेलाने त्वचेवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील टॅन दूर होईल.

हृदयाचे आरोग्य सुधारते:

शरीरातील प्रमुख म्हणजे हृदय. मात्र खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर थेट हृद्ययावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी हातात अशावेळी काळ्या तिळाचे सेवन करावे.

हेही वाचा :

या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता कर्जही मिळणार

डॉक्टर नवऱ्यानेच रचला बायकोच्या हत्येचा कट, मेहुणीसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे…

महिला उद्योजाकांना सरकारची साथ ! मिळणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज, अर्थमंत्र्यांची घोषणा