IND vs NZ : औपचारिक सामना भारताला जिंकावाच लागणार, नाही तर अंतिम फेरी विसरा!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट दोन संघांना मिळालं (formal)आहे. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर ब गटात उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे. साखळी फेरीत अ गटातील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. तसं पाहिलं तर हा सामना औपचारिक आहे. या सामन्याच्या जय पराजयाने उपांत्य फेरीच्या निकालावर काही परिणाम होणार नाही. पण असा विचार करून गाफील राहण्यात अर्थ नाही.

साखळी फेरीत चार संघांना अशाच विचारामुळे फटका बसला. पाकिस्तान-बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण अफ्रिका सामन्यात पावसाने हजेरी लावली. यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघांचं सामना न झाल्याने नुकसान झालं. प्रत्येकाच्या वाटेला 1 गुण आला आणि उपांत्य फेरीचं गणित जर तरवर येऊन ठेपलं. असं असताना भारत न्यूझीलंड सामन्यामुळे काय परिणाम होईल असा प्रश्न पडला असेल. तर जाणून घ्या काय होऊ शकतं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीचा सामना होत आहे. हा सामना गमवणं दोन्ही संघांना महागात पडू शकतं. जर या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर भारताला पुढच्या प्रवासात नक्कीच त्रास होऊ शकतो. सध्या गुणतालिके न्यूझीलंडचा संघ 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. कारण भारतापेक्षा(formal)न्यूझीलंडचा नेट रनरेट हा चांगला आहे. या गटात भारताला टॉपला जायचं असेल तर सामना जिंकण्याशिवाय पर्याय नाही. कारण या विजयावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित अवलंबून असणार आहे.
भारताचा उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला होणार आहे. यावेळी भारतीय संघ टॉपला राहिल्यास ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी, जर दुसऱ्या स्थानी राहिला तर ब गटातील पहिल्या स्थानावरील संघाशी सामना करेल. आयसीसीने बाद फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारताचा सामना पावसामुळे (formal)या दिवशी झाला नाही तर 5 मार्चला हा सामना होईल. 4 मार्चला सामना जिथे थांबला तेथून पुढे 5 मार्चला सुरुवात होईल.
दोन्ही बाजूने 20 षटकांचा खेळ झाला असेल आणि राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जाईल. पण तसंही झालं नाही आणि पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर अ गटातील टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे ही शक्यता पाहता भारताला अ गटात टॉपला राहावंच लागेल. यासाठी साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करण्याशिवाय पर्याय नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
1 मार्चपासून ‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जगतील राजासारखं आयुष्य
जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल