या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ! तारीख नोट करुन ठेवा
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करुन(clash) दाखवली आहे. या स्पर्धेतील कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने स्पेनला २-१ ला पराभूत करत कांस्यपदकाला गवसणी घातली. दरम्यान आता भारतीय हॉकी संघ पुढील आव्हानासाठी सज्ज झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक झाल्यानंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे(clash) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ भिडणार आहेत. ज्यात भारत – पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला येत्या ८ सप्टेंबरला सुरुवात होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तानसह जपान,चीन, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या संघांचाही समावेश असणार आहे.
या स्पर्धेतील भारतीय संघांबद्दल बोलायचं झालं,तर भारताचा सामना ४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी जपानसोबत,११ सप्टेंबरला मलेशिया, १२ सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियाशी होणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येक संघाला १-१ सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. तर टॉप ४ संघांना उपांत्यफेरीत स्थान मिळणार आहे. त्यामुळे ४ सप्टेंबर ही तारीख नोट करुन घ्या. या दिवशी तुम्हाला हॉकीच्या मैदानावर अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
..अन् अमिताभ बच्चन यांनी थेट हाथच जोडले; नेमकं असं काय घडलं?
अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा
आता बँकेत जाण्याची गरज संपली; SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज