लाॅर्ड्स कसोटीसाठी भारताचा संघ सज्ज! जसप्रीत बुमराहचे होणार पुनरागमन

भारताच्या संघाने एजबॅस्टनमध्ये विजय मिळवला आहे. हा ऐतिहासिक विजय भारतासाठी फारच महत्त्वाचा होता. (team )आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे आयोजन लॉर्ड्स मैदानावर करण्यात आले आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याला होणार सुरुवात : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आजपासून (team ) म्हणजेच १० जुलै रोजी मालिकेच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे आयोजन लॉर्ड्स मैदानावर करण्यात आले आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा आनंद नक्कीच उंचावलेला असेल. भारताच्या संघाने एजबॅस्टनमध्ये विजय मिळवला आहे. हा ऐतिहासिक विजय भारतासाठी फारच महत्त्वाचा होता. आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे.

भारतीय संघाचे फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत, पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली (team ) नव्हती त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी कहर केला. विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. आज भारताच्या संघामध्ये बदल होणार आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे संघांमध्ये पुनरागमन होणार आहे. त्याच्या जागेवर आकाशदीप याला संघामध्ये स्थान मिळाले होते त्यानंतर आता आकाशदीप हा त्याच्या कामगिरीमुळे संघामध्ये कायम राहील असा अंदाज लावला जात आहे.

तर वॉशिंग्टन सुंदर याने देखील संघासाठी मिळालेल्या संधीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. वॉशिंग्टन सुंदर याला संघामध्ये कायम ठेवले जाणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. साई सुदर्शनच्या जागेवर दुसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डी याला संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो दोन्ही डावामध्ये फेल ठरला. इंग्लंडच्या संघाने त्यांची प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे कसोटी क्रिकेटमध्ये ४ वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन होणार आहे.

हेही वाचा :