फक्त एका मुळे भारताने जिंकला सामना, रोहितने मॅचनंतर सांगितलं सिक्रेट
भारताने (india)फक्त ११९ धावा केल्या होत्या. पाकिस्तान हे आव्हान लीलया पेलेल, असेव वाटत होते. पण त्याचवेळी एक वाक्य भारतासाठी वरदान ठरले. या एका वाक्यामुळे भारताला पाकिस्तानवर दमदार विजय मिळवता आला. हा सामना संपल्यावर रोहित शर्माने हे गुपित सर्वासमोर उलगडले.
भारतीय संघ जेव्हा ११९ धावांवर ऑल आऊट झाला. तेव्हा भारताच्या विजयाची शक्यता ही ८ टक्के टीव्हीवर दाखवली गेली होती, तर पाकिस्तानच्या विजयाची शक्यता ही ९२ टक्के होती. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. पाकिस्तानच्या तोंडातील विजयाचा घास त्यांनी हिरावला. पण यावेळी भारतीय खेळाडूंच्या मनात एक वाक्य कायम रुंजी घालत होतं. हेच एक वाक्य भारताच्या विजयासाठी मोलाच ठरलं, असे रोहित शर्मानेही सांगितलं.
सामना संपल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, ” आम्ही पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी केली नाही. पहिल्या १० षटकांत आमचा खेळ चांगला झाला नाही. पण त्यानंतर काही चांगल्या भागीदारी झाल्या आणि त्यामुळेच आम्ही ११९ धावा करू शकतो. माझ्यामते आम्हाला १५-२० धावा कमी पडल्या होत्या. कारण आम्हाला किमान १४० धावांपर्यंत पोहोचायचे होते. पण तरीही आम्ही सामना जिंकलो, कारण संघातील खेळाडूंच्या मनात एक वाक्य बिंबवले गेले होते. ते वाक्य होते की, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. हे वाक्य संघातील सर्व खेळाडूंच्या डोक्यात होते आणि या एका वाक्यामुळेच आम्हाला विजय मिळवणे सोपे झाले.”
रोहित पुढे म्हणाला की, ” या सामन्यात आमची गोलंदाजी चांगली झाली. अखेरच्या १० षटकांत तर गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला आणि त्यामुळेच आम्हाला विजय साकारता आला. पण हा सामना म्हणजे फक्त सुरुवात आहे, असे मी मानतो. कारण अजून बराच लांबचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. मी आभार मानतो ते चाहत्यांचे. कारण जगातील कोणत्याही कोपऱ्यात ते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतात. या सामन्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावर हसू घेऊन नक्कीच घरी परतले असतील.”
भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवले, असे फार कमी जणांना वाटत होते. कारण भारताकडे फक्त ११९ धावा होत्या. टी-२० क्रिकेटमध्ये ही माफक धावसंख्या समजली जाते. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी कमाल केली. अखेरच्या १० षटकांमध्ये तर भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा केला आणि त्यामुळेच भारताला विजय मिळवता आला.
हेही वाचा :
स्मार्ट प्रिपेड मीटर सामान्यांची लूट करण्यासाठी; कोल्हापुरात ‘आप’चा आरोप
अवघ्या 12 तासांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी घट
मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक…
सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात