नीट परीक्षेतील गैरप्रकार पुनर्परीक्षा घेण्याची इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची मागणी
डॉक्टर (doctor)होण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. मात्र त्यात गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच परीक्षेच्या निकालात निष्पक्ष मूल्यमापन प्रक्रिया व्हावी यासाठी पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने सरकारकडे केली आहे
नीट २०२४ ही वैद्यकीय परीक्षा सुमारे ५७१ शहरांमध्ये १३ भाषांमध्ये घेण्यात आली. २ लाख १० हजार १०५ निरीक्षकांच्या देखरेखीखाली ४ हजार ७५० केंद्रांवर ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी सुमारे २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सुमारे १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर चौघांना ७२० पैकी ७१५ गुण मिळाले. देशभरातील फक्त दोन विद्यार्थ्यांना २०२३ मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. मात्र २०२२ मध्ये एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले नाहीत.
हेही वाचा :
एटीएममधून पैसे काढणे महागणार; यापुढे किती रुपये आकारले जातील!
भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ, प्रकाश आंबेडकर यांची जहरी टीका.