Champions Trophy 2025 साठी भारतीय संघाची घोषणा उद्या होणार!

बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात(champions trophy)कोणाला संधी मिळणार आणि कधी भारतीय संघाची घोषणा होणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी शनिवारी 18 जानेवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12.30 वाजता कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर पत्रकार परिषद करून भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाला संधी मिळाली आहे.

याबाबत माहिती देणार आहे. असं बीसीसीआयकडून प्रेस रिलीज जारी करून सांगण्यात आलं आहे.प्रेस रिलीजमध्ये बीसीसीआयने सांगितले की, पुरुष निवड समिती उद्या इंग्लंडविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक एकदिवसीय मालिकेसाठी आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी (champions trophy)भारताचा संघ निवडेल. निवड बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. अशी माहिती बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये दिली आहे.

19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने सुरक्षेमुळे पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नसल्याने भारताचे सामने युएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबई येथे सामना होणार आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी (champions trophy)बांगलादेशविरुद्ध आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध भारत खेळणार आहे. स्पर्धेच्या अ गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह पाकिस्तानचा समावेश आहे तर ब गटात ऑस्ट्रेलियासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.तर इंग्लंडविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक एकदिवसीय मालिकेची सुरुवात 6 फेब्रुवारीपासून होणार आहे तर त्यापूर्वी दोन्ही संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा :

Kia Seltos चा बेस व्हेरियंट, 2 लाखाचे डाउन पेमेंट आणि फक्त भरा दरमहा ‘एवढा’ EMI

शरद पवारांना मोठा धक्का! बडा नेत्याचा लवकरच अजित पवार गटात प्रवेश

रोजगारात भारताचा डंका, अमेरिकेनंतर दुसरा

शुभ संयोग ‘या’ राशींवर असणार शनिदेवाचा कृपा; मिळणार उत्तम संधी

Chanakya Niti: वाईट काळाची चाहूल देणारे महत्त्वाचे संकेत