अमेरिकेतून पुन्हा भारतीयांना केले हद्दपार; ट्रम्प प्रशासनाची कारवाई सुरूच

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या(America) डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, पुन्हा एकदा अनेक भारतीयांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी भरलेले एक विमान १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अमृतसरमध्ये उतरणार आहे. याआधीही अमेरिकेने अशाच स्वरूपाच्या मोहिमेत १०४ भारतीयांना अमृतसरमार्गे मायदेशी परत पाठवले होते.

अमेरिकेतील(America) स्थलांतर धोरण अधिकाधिक कठोर होत असून, बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहिम राबवली जात आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हद्दपारीसाठी आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण केल्या असून, परत पाठवण्यात येणाऱ्या भारतीयांची अधिकृत यादी लवकरच जाहीर केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीला येणाऱ्या विमानाशिवाय पुढील काही दिवसांत आणखी एक विमान भारतीय नागरिकांना घेऊन येण्याची शक्यता आहे. तथापि, यावेळी किती भारतीय मायदेशी परतणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, पुन्हा एकदा अनेक भारतीयांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी भरलेले एक विमान १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अमृतसरमध्ये उतरणार आहे. याआधीही अमेरिकेने अशाच स्वरूपाच्या मोहिमेत १०४ भारतीयांना अमृतसरमार्गे मायदेशी परत पाठवले होते.

अमेरिकेतील स्थलांतर धोरण अधिकाधिक कठोर होत असून, बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहिम राबवली जात आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हद्दपारीसाठी आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण केल्या असून, परत पाठवण्यात येणाऱ्या भारतीयांची अधिकृत यादी लवकरच जाहीर केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीला येणाऱ्या विमानाशिवाय पुढील काही दिवसांत आणखी एक विमान भारतीय नागरिकांना घेऊन येण्याची शक्यता आहे. तथापि, यावेळी किती भारतीय मायदेशी परतणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा :

मोठी बातमी! प्रसिद्ध गायकाचा अपघात…

तुमची मुलं सतत चिडचिड करतातअल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या रागामागचं खरं कारण

आईची हत्या करून अवयव शिजवून खाणारा नराधम; उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय