ट्रॅव्हिस हेडच्या विचित्र हातवाऱ्यामुळे भारतीयांमध्ये नाराजी; पॅट कमिन्सने स्पष्ट केला सेलिब्रेशनचा कारण!

भारत (team india)विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 340 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारताला 155 धावाच करता आल्या. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने विजयानंतर जोरदार सेलीब्रेशन केले. दरम्यान सध्या ट्रॅव्हिस हेडने केलेल्या सेलिब्रेशनची सध्या क्रिकेटविश्वात चर्चा आहे. ऋषभ पंतची विकेट घेतल्यानंतर ट्रेव्हिस हेडने विचित्र हातवारे करत सेलिब्रेशन केले. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (team india)भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांनी हेडवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे.
मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रॅव्हिस हेडचे घृणास्पद वर्तन सज्जनांच्या खेळासाठी चांगले नाही. हे सर्वात वाईट उदाहरण आहे जेव्हा लहान मुले, महिला, तरुण आणि वृद्ध हा खेळ पाहतात. या वर्तनाने एका व्यक्तीचा नव्हे तर सव्वाशे कोटी भारतीयांच्या राष्ट्राचा अपमान केला आहे आणि भावी पिढ्यांना मारक म्हणून कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे काम करा जेणेकरुन इतर कोणी असे करण्यास धजावणार नाही, असं नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.
पॅट कमिन्स म्हणाला की, त्याने बरेच झेल घेतले. त्यामुळे त्याला असे दाखवायचे असावे की त्याच्या हाताची बोटं आता गरम झाली आहेत. त्यामुळे त्याला बर्फाने भरलेल्या एखाद्या ग्लासमध्ये बोटं घालून ठेवावी लागतील. त्यात वाईट किंवा विचित्र असे काहीच नाही.
ऋषभ पंतला बाद केल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने ज्या पद्धतीने सेलीब्रेशन केले, ते समजणे कठीण होते. मात्र याआधी देखील हेडने या पद्धतीने सेलीब्रेशन केले होते. श्रीलंकेविरुद्ध हेडने गोलंदाजी करतना 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी देखील अशाच पद्धतीने हेडने सेलिब्रेशन केले होते.
The reason behind the Celebration of Travis Head. pic.twitter.com/FiRbZVYFrR
— Johns. (@CricCrazyJohns) December 30, 2024
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
क्रशची Instagram Story पाहायची? तेही तिला कळू न देता! ह्या ट्रिक्स करतील तुम्हाला मदत
CBSC आणि CET परीक्षांचे वेळापत्रक एकाच दिवशी, विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘गेम चेंजर’ची ट्रेलर रिलीज डेट आणि वेळ ठरली!