‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो बॅन? रणवीर-समयच्या अडचणी वाढल्या

मुंबई- सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया चांगलाच अडचणीत सापडला आहे. इंडियाज् गॉट लेटेंट या शोमध्ये(show) त्याने आई वडिलांवरुन केलेल्या अश्लील विधानामुळे त्याला टीकेचं धनी व्हावं लागतयं. सध्या सोशल मीडियावरसुद्धा हे प्रकरण चांगलचं तापलं आहे. अश्लील विनोद केल्याबद्दल युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियने माफी मागितली होती. परंतू यानंतरही त्याचे त्रास थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत..

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (एनएचआरसी) तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत, NHRC ने YouTube ला एक पत्र लिहिले आहे. यानंतर, युट्यूबने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचा(show) वादग्रस्त व्हिडिओ डिलीट केला. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुंबई पोलिसांनी मंगळवारी समय आणि रणवीरला समन्स पाठवले आहेत.
दुसरीकडे, सरकारी हस्तक्षेप आणि कायदेशीर तक्रारीनंतर, YouTube ने समय रैनाने होस्ट केलेला आणि रणवीर अलाहबादिया, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्व मखीजा यांनी जज म्हणून सादर केलेला वादग्रस्त ‘इंडियाज गॉट लेटेंट’ भाग काढून टाकला आहे. हा व्हिडिओ आता भारतात उपलब्ध नाही.
विनोदी कलाकार समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोबद्दल सर्वत्र गोंधळ आहे. शोशी संबंधित निर्मात्यांच्या समस्या वाढत आहेत. रणवीर अलाहाबादच्या टिप्पणीवर बंदी घालण्याची मागणी अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. त्याच वेळी, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याबद्दल सांगितले आहे.
आता, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन ने YouTuber रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवरील केलेल्या विधानावर तीव्र निषेध केला आहे. त्यांनी शोवर बंदी घालण्याची आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी संध्याकाळी, AICWA ने म्हटले की, अलाहबादिया यांचे विधान आक्षेपार्ह आहेत आणि “सामाजिक तसेच कौटुंबिक मूल्यांच्या” विरुद्ध आहेत. असोसिएशनने भारतीय फिल्म इंडस्ट्रीला या शोमध्ये सहभागी असलेल्यांना बॉयकॉट करण्यास सांगितले आहे.

AICWA ने लिहिले की, ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) समय रैनाने त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये केलेल्या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधानाचा तीव्र निषेध करते. अलिकडच्याच एका भागात, शोमध्ये आलेल्या पाहुणा रणवीर अलाहाबादियाने अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यांवर खूप टीका होत आहे. ज्या आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांचा अत्यंत अनादर करणाऱ्या आहेत. असा अपमानजनक मजकूर पूर्णपणे अस्वीकार्य आहे. त्यामुळे आपल्या समाजाच्या नैतिक रचनेला धोका निर्माण होऊ शकतो.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘संपूर्ण भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करत, AICWA अधिकृतपणे इंडियाज गॉट लेटंटवर बहिष्कार घालते. आम्ही सर्व अभिनेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञान यांनी, ज्यात होस्ट समय रैना आणि रणवीर अलाहबादिया यांचा समावेश आहे, त्या शोशी असलेले सर्व संबंध तात्काळ थांबवावेत अशी आमची मागणी आहे.
AICWA पुढे म्हणाले, ‘आतापासून या लोकांना भारतीय फिल्म इंडस्ट्रीकडून कोणताही पाठिंबा मिळणार नाही. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वर पूर्ण बंदी घालावी, रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, सर्व जबाबदार व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करावा आणि अशाच प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे.
राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट केले की, ‘विनोदी कंटेंटच्या नावाखाली मर्यादा ओलांडणारी कोणतीही अपशब्द स्वीकार्य नाही. फक्त तुम्हाला व्यासपीठ मिळाले म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकता असे नाही. तो असा माणूस आहे ज्याचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत, प्रत्येक राजकीय व्यक्ती त्याच्या पॉडकास्टवर उपस्थित आहे. पंतप्रधानांनी त्याला हा पुरस्कार दिला आहे… माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्थायी समितीची सदस्य म्हणून मी हा मुद्दा उपस्थित करेन.
हेही वाचा :
राष्ट्रपती मुर्मूच्या अमृतस्नानासाठी 12 तास महाकुंभमेळा रोखला? विरोधी नेत्यांचा आक्रमक पवित्रा
धक्कादायक ! पतीच्या आत्महत्येने पत्नी निराश; मुलीसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
Jio देत आहे फ्री Set-Top-Box! लाइव्ह टीव्ही चॅनेलसह मिळेल नेटफ्लिक्सचा आनंद