सणावर महागाईची संक्रांत; दर वाढल्यामुळे तिळगुळही लागेना गोड
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/12/image-378.png)
गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिलाच सण असलेली मकरसंक्रांत(sankranti) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. मात्र यंदा बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध असलेल्या साहित्यांच्या चढत्या किमती लक्षात घेता संक्राती सणात सर्वसामान्याना महागाईचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/12/image-255-1024x1024.png)
नववर्षातील पहिला सण म्हणून मकरसंक्रातीला(sankranti) विशेष महत्त्व असतो. मात्र या सणाला लागणाऱ्या भाज्या व इतर वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्याने नागरिकांना खरेदी करताना आखडता हात घ्यावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. उरला असून शहरातील मुख्य बाजारपेठ संक्रांतीसाठी सज्ज होताना दिसत आहेत.
संक्रांतीला महिला घरोघरी हळदी-कुंकूचे आयोजन करीत असतात. त्यानिमित्ताने वाण म्हणून एखादी वस्तू दिली जाते. यासाठी बाजारपेठेत स्टीलच्या लहान मोठ्या गृहोपयोगी वस्तू व साहित्य बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र विविध प्रकारात असलेल्या स्टील साहित्यांच्या किमतीतही मागील वर्षीच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलावर्ग साहित्य खरेदी करताना हात आखडण्याची चिन्हे बळावली आहेत.
मकरसंक्रांती सणात तिळगुळाला मोठे महत्त्व असते. महिलावर्ग तीळ व गुळाचे मिश्रण करून तिळगूळ पदार्थ तयार करून एकमेकांना खाऊ घालतात. मागील वर्षी तिळाचे दर 150 ते 170 रुपये किलो होते, यंदा मात्र तीळ प्रतिकिलो 180 ते 220 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. तर गुळाचे दर प्रतिकिलो 55 ते 70 रुपये किलोवर गेले आहे. तिळगुळाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे संक्रांतीचे बजेट चांगलेच वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पतंग आणि माज्यांच्या किमतीत यंदा 10 ते 20 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
चायनीज, नायलॉन मांजाची विक्री सुरूच
शासनाने चायनीज मांजा तसेच नायलॉन मांजावर बंदी असतांनाही शहरात त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पशुपक्षांसह मनुष्य जीवालाही धोका उद्भवत असल्याने शासनाने यावर बंदी आणली असतानाही बंदी झुगारून मांजाची विक्री होत आहे. या मांजामुळे पंतग उडवितांना अनेक इसम जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मकरसंक्रातीच्या पर्वावर बंदी असलेल्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पतंग बाजारात उपलब्ध आहेत. त्याची किंमत 50 ते 450 रुपयापर्यंत आहे. कागदाच्या पारंपारिक पतंगसुद्धा बाजारात दाखल झाल्या आहेत. त्याची किंमत 8 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत आहेत. याच किंमती मागील वर्षी 5 ते 150 रुपयांपर्यंत होत्या.
हेही वाचा
सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय!
बाईकची डिवाइडरला जोरदार धडक, हवेत उडाले अन् जागीच… मृत्यूचा थरारक Video Viral
जिओच्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये मोठा बदल!