उन्हाच्या तडाख्यात वीज ग्राहकांना महागाईचा झटका

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागात(consumer durable loan) तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. पुढील महिन्यात परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागल्याने या ग्राहकांना वीजेच्या महागाईचा झटका बसणार आहे.

वीज बिलवाढीचा अदानी कंपनीच्या ३० लाख ग्राहकांना(consumer durable loan) झटका बसणार आहे. निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी वाढ होणार आहे. मे महिन्यांपासून ही वाढ होणार आहे. इंधन खर्चातील वाढीमुळे ३१८ कोटी ३८ लाख रुपये वसूल करण्यासाठी अदानी कंपनीने राज्य वीज नियामक आयोगापुढे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आयोगाकडून ही मंजुरी मिळाली.

वीज दरवाढ कशी असणार ?
०-१०० वीज युनिट वापर – प्रति युनिट ७० पैसे

१०१-३०० युनिटसाठी १.१० रुपये

३०१-५०० युनिटसाठी १.५ रुपये

५०० हून अधिक युनिट वापर – १.७० रुपये इंधन अधिभार

दरम्यान, या वीज दरवाढीचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. मे महिन्यांपासून ही दरवाढ होणार असल्याने मुंबईकरांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, देशातील दक्षिण राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीज दरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तर भारतातील राज्यांमध्येही वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. पण राज्यात ही वीजदरवाढ इतर राज्याच्या तुलनेत सर्वात महागडी वीज मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, मध्य प्रदेशात वीज दरवाढ झाली. या राज्यांच्या तुलनेत राज्यातील वीजेचा दर जास्त असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

मॅच झाल्यानंतर रोहित शर्माच्या कृतीमुळे हार्दिक आणि मुंबई इंडियन्सला मिरची झोंबली

‘मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात!’ पापाराझीवर भडकली Nora Fatehi