सांगली : आठ व नऊ फेब्रुवारीला शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद
देशातील पतसंस्थांच्या अडीअडचणी आणि समस्या शासनाला कळाव्यात यासाठी दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे (Conference)आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
दरम्यान या सहकार परिषदेच्या (Conference)निमित्ताने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सांगलीमध्ये सहकार दिंडीचे आगमन होणार असून त्याचे स्वागत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पतसंस्था फेडरेशनचे जिल्हा चेअरमन ए डी पाटील यांनी दिलीय.
हेही वाचा :
अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, ‘या’ खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका
सुसाट रिक्षातून ३ विद्यार्थिनी पडल्या; एकीचा जीव गेला
विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral