IRCTC चा हनिमून टूर पॅकेज! पार्टनरसोबत फिरा युरोप, पॅकेज खर्च किती?

सध्या उन्हाळा आणि लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या दरम्यान अनेक जोडप्याचे लग्न(honeymooners travel) होते. अनेकदा लग्नानंतर फिरायला किंवा हनिमूनला कुठे जायचे असा प्रश्न अनेक कपल्सला पडतो.

जोडप्यांसाठी आयआरसीटीसीने (honeymooners travel) भन्नाट प्लान आणला आहे. तुम्ही बजेटमध्ये यूरोप फिरू शकता. तसेच हा प्लान हवाई टूर पॅकेजमध्ये तुम्ही युरोपमधल्या अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. तुम्हालाही फिरायला जायचे असेल तर जाणून घेऊया IRCTC च्या टूर पॅकेजबद्दल..

पॅकजचे नाव

European Express Ex Lucknow (NL019)

पॅकेज कालावधी

१२ रात्री आणि १३ दिवस

प्रवास

फ्लाइट मोड

कुठे फिरता येईल?

झुरिच, ब्रसेल्स, फ्रँकफर्ट, अॅमस्टरडॅम आणि पॅरिस

प्रवास कधी ?

२९ मे २०२४

 कोणत्या सुविधा मिळतील?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.
  • राहाण्यासाठी थ्री स्टार हॉटेलची सुविधा मिळणार आहे. यामध्ये एसी टू बाय टू बसने फिरता येईल.
  • ८० वर्षांपर्यंतच्या प्रवाशांना या पॅकेजमध्ये प्रवासी विमा मिळेल.
  • या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल.

प्रवासाचा खर्च किती येईल?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ३,६७,८०० रुपये (Price) मोजावे लागतील.
  • कपल्स जाणार असाल तर प्रत्येक व्यक्तीला ३,०६,१०० रुपये द्यावे लागतील.
  • जर तुम्ही फॅमिली ट्रिप करत असाल तर प्रति व्यक्तीला ३,०५,४०० रुपये भरावे लागतील. जर यामध्ये तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला बेडसाठी (5-11 वर्षे) २, ८५,१०० रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय २,१०,८०० रुपये मोजावे लागणार आहे.

बुकिंग प्रोसेस

या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

हेही वाचा :

धक्कादायक! ४७ वर्षीय गायिकेचा मृत्यू; घरात आढळला मृतदेह

देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान

राज्यात समाजवादी पक्षाला मोठा धक्का, रईस शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी; अजित पवार गटात करणार प्रवेश?