पुन्हा प्रेमात पडलाय शिव ठाकरे? त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

मुंबई: गेल्या दोन तीन वर्षात हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत गाजणारं एक मराठी नाव(love) म्हणजे शिव ठाकरे. शिव मनोहरराव उत्तमराव झिंगुजी गणुजी ठाकरे’ असं नाव सांगत शिव ठाकरे आधी ‘रोडिज’मध्ये आणि नंतर मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यानं बिग बॉस मराठीचं विजेतेपदही पटकावलं. या बिग बॉसच्या घरात त्याचं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री वीणा जगताप हिच्यासोबत. दोघांच्या नात्याची खूप चर्चा झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यात खास नातं टिकून होतं. पण काही महिन्यांतच त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

शिव आणि वीणामध्ये नेमकं काय बिनसलं, ब्रेकअपचं(love) कारण काय? याबद्दल आजही चर्चा सुरू असतात. पण आता शिव पुन्हा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी कारण ठरतोय शिव ठाकरेनं शेअर केलेला एक फोटो. शिवनं विमान प्रवासातला एक फोटो शेअर केलाय. या फोटोत शिव एका तरुणीच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. पण त्यानं त्या तरुणीचा चेहरा मात्र दाखवला नाहीये. त्यानं त्या तरुणीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी पोस्ट केलाय. त्यामुळं ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.

दरम्यान, शिवनं गेल्या काही महिन्यांत त्याच्या रिलेशनशीपबद्दल फार काही सांगितलं नाहीये. पण ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यानं त्यानं कॉलेजमधल्या प्रेमाबद्दल सांगतिलं बोतं. ‘कॉलेजमध्ये असताना मी एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल आठ वर्षे रिलेशनमध्ये होतो’, असं शिवनं म्हटलं होतं.

आम्ही अमरावतीमधल्या एका देवीच्या मंदिरात जायचो. ती त्या मंदिरात न विसरता माझ्यासाठी ११ रुपये दान पेटीत टाकायची, माझ्यासाठी प्रार्थना करायची, अशी आठवणही त्यानं सांगितली होती. तेव्हा माझ्या करिअरची सुरुवातही नव्हती झाली. पण तिला लग्न करायचं होतं. त्यामुळं आम्ही वेगळे झालो..असा खुलासाही त्यानं केला होता. दरम्यान, आता शिवच्या आयुष्यात आलेली ही मुलगी कोण? याबद्दल आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा:

क्रिती सेनन बॉयफ्रेंडसोबत परदेशात… VIDEO

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका; LPG सिलिंडर महागलं

गोव्यात दारूबंदी? भाजपाच्या आमदाराची मागणी म्हणाले, “पर्यटक गोव्यात फक्त मद्यासाठी येत नाहीत”