‘टीम DM’ अ‍ॅक्टिव्ह? आमदाराच्या निकटवर्तीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण(current political news) सध्या प्रचंड तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांच्या समर्थक आणि विरोधकांमधील वाद अधिक चिघळताना दिसत आहे. बीडमध्ये “टीम DM” म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या गटाचे सदस्य सक्रिय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये माजलगाव विधानसभा(current political news) मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे निकटवर्तीय सुशील सोळंके माजलगाव तहसीलदारांना शिवीगाळ आणि दमदाटी करताना दिसत आहे. या प्रकरणात पोलीस यंत्रणेवरही दबाव टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार वर्षा मनाळे या गोदावरी नदीपात्रातील शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी, प्रकाश सोळंके यांचे निकटवर्तीय सुशील सोळंके ग्रामस्थांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि अधिकाऱ्यांना धमकावले. एवढेच नाही, तर त्यांनी प्रकाश सोळंके यांनाही तिथून फोन करून परिस्थितीबाबत माहिती दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा सहभाग उघड झाल्यानंतर, मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बीडमध्ये राजकीय समीकरणे बदलली. सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात एकवटले होते. मात्र, आता त्यांच्या समर्थकांनी पुन्हा राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या समर्थकांचे व्हिडीओ सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले होते. आता प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित असलेल्या सुशील सोळंके यांच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय तणाव अधिक वाढला आहे.

मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुशील सोळंकेवर आधीच गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. आता प्रशासनाला धमकावतानाचा व्हिडीओ समोर आल्याने, काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

4 महिन्यांच्या संसारानंतर अभिनेत्री अदिती शर्मा घटस्फोट घेणार?

… म्हणून ‘तारक मेहता..’ फेम बबिताजीने अद्याप लग्न केलं नाही; कारण वाचून थक्क व्हाल!

निधीवाटपातही शिंदेंसोबत दुजाभाव, भाजप, राष्ट्रवादीला जास्त तर शिवसेनेला कमी