तिसऱ्यांदा लग्न करतोय हा सुपरस्टार? वाढदिवसाच्या पार्टीत नटूनथटून पोहोचलेली अभिनेत्री
मुंबई: भोजपुरी सुपरस्टार(superstar) पवन सिंग त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येतो. अलीकडेच ५ जानेवारी रोजी त्याने ३९वा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत काही खास व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी अभिनेत्री चांदनी सिंगने विशेष लक्ष वेधून घेतले, जिने लाल रंगाची साडी नेसलेली आणि हातावर मेंदीही काढली होती.
चांदनी एका नववधूसारखी दिसत होती. चांदनीच्या अशा लूकनंतर पवन आणि तिच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. याआधी पवनचे दोन वेळा लग्न झाले असून, लग्नानंतर वर्षभरानंतर पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू आहे.
पवन सिंहने(superstar) लखनऊमध्ये वाढदिवस साजरा केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकिट नाकारलेल्या या अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत, भाजपचे असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक ते माजी खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनोज तिवारीही सहभागी झाले होते.
या पार्टीत पवनच्या आई प्रतिमा सिंह पूर्ण वेळ चांदनीसोबत दिसल्या. त्यामुळे अभिनेत्याच्या आईनेच या लग्नाचे संकेत दिले आहे. चांदनीने त्यांच्यासोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. अभिनेत्याच्या आईने असेही संकेत दिले की २०२५ मध्ये धमाका होणार आहे आणि त्यांनी आपल्या मुलाला असाच आशीर्वाद दिला की त्याचे आयुष्य बदलून जावे. चांदनीने इन्स्टाग्रामवर पवनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. असे असले तरी अद्याप चांदनी किंवा पवन या दोघांनीही या लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही.
पवन सिंहने २०१४ मध्ये नीलम सिंहसोबत लग्न केले. या लग्नसोहळ्यात कुटुंबीय, मित्र, नातेवाईकांसह भोजपुरी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. लग्नानंतर वर्षभरातच नीलमने ८ मार्च २०१५ रोजी आत्महत्या केली होती.
३ वर्षांनंतर पवनने बलियामध्ये ज्योती सिंहशी लग्न केले आणि या लग्नसोहळ्यात फक्त जवळचे लोक उपस्थित होते. २०२२ मध्ये पवनने ज्योतीपासून वेगळे होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही, कारण ज्योतीने हे पाऊल उचलण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :
विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूची गैरवर्तणूक, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
‘आयुष्य नर्क झालं असतं जर…’, जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य
खुशखबर! ही कंपनी ऑफर करतेय अनलिमिटेड इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळणार!
एक महिना आधीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, संतोष देशमुखांच्या पत्नीचा महत्त्वाचा जबाब