सर्वच महिलांना सुंदर आणि उजळदार त्वचा(skin ) हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे स्किन केअर केले जाते. वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर, सनस्क्रीन किंवा इतर अनेक प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेतली जाते. वाढत्या वयात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन. चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढल्यानंतर महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक वेगवेगळे उपाय करतात.
याशिवाय सोशल मीडियावर पाहून वेगवेगळ्या क्रीम, लोशन लावले जातात. याशिवाय काही महिलांना गाल, ओठ किंवा हनुवटीच्या आजूबाजूला पिगमेंटेशन वाढू लागते. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन मेकअप केल्यानंतर सुद्धा कमी होत नाही. त्यामुळे त्वचेसंबंधित(skin ) समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करू नये.
चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, मुरूम, पिंपल्स किंवा फोड घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर त्वचा अधिकच काळी वाटू लागते. त्वचेवरील संपूर्ण ग्लो कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल.
पिगमेंटेशन कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थ:
बटाटा:
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना बटाट्याचा वापर केला जातो. बटाट्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही बटाटा स्वच्छ धुवून पातळ चकत्या करा.
कापून घेतलेल्या बटाट्याच्या चकत्या पाण्यात ठेवून नंतर त्वचेवर(skin ) ठेवा. यामुळे त्वचा वाढलेले पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर बटाटा हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर फिरवून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी होईल आणि त्वचा उजळदार सुंदर दिसेल.
मसूर डाळ:
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मसूर डाळ अतिशय प्रभावी ठरते. मसूरची डाळ त्वचा आतून स्वच्छ करते. याशिवाय त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मसूर डाळ अतिशय प्रभावी आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घेऊन बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात कच्चे दूध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले सर्व पिगमेंटेशन कमी होईल.
टोमॅटो:
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अॅसिडिक घटक चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात. संपूर्ण पिकलेल्या टोमॅटोचा रस काढून संपूर्ण चेहऱ्यावर लावून नंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन इत्यादी कमी होण्यास मदत होईल. काहीवेळ ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :