लघवी करताना सतत होणारी जळजळ असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. (sensation )मात्र वारंवार शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा लघवी करताना जळजळ होते तर काहीवेळा उन्हाळी लागण्याची शक्यता असते.लघवीमध्ये होणारी जळजळ बऱ्याचदा अतिशय सामान्य समस्या म्हणून ओळखली जाते. पण सतत लघवी करताना जळजळ होत असल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात. लघवीमध्ये होणारी जळजळ केवळ डिहायड्रेशनमुळेच नाही तर मूत्रपिंडातील आजार किंवा मधुमेह, किडनीच्या आजारांमुळे सुद्धा होऊ शकते. त्यामुळे या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

लघवीमध्ये वाढलेली जळजळ अनेक लोक सामान्य समस्या म्हणून लक्ष देतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक आहे. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. ही समस्या उद्भवू लागल्यानंतर मूत्रमार्गात इन्फेक्शनचा धोका वाढतो. (sensation )बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात, ज्यामुळे मूत्रपिंडात वेदनांना होणे, जळजळ होणे किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका वाढू लागल्यास स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ही समस्या टाळण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि लैंगिक संबंधांनंतर लघवी करावी.

लघवी करताना जळजळ होण्यामागे अनेक कारण आहेत. लैंगिक संबंधातून पसरणारे आजार झाल्यानंतर सुद्धा लघवीमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. (sensation ) गोनोरिया, क्लॅमिडीया यांसारखे लैंगिक संसर्ग यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे, कंडोमचा वापर करावा. यामुळे हे आजार शरीरात प्रवेश करत नाही.

अधिक वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे मूत्रातील खनिज पदार्थ एकत्र होऊन मूत्रपिंडात खड्डे तयार होण्याची शक्यता असते. हे खड्डे झाल्यानंतर ओटीपोटात वेदना होणे, लघवी करताना वाढलेली जळजळ, लघवी करताना वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :