मुहूर्त ठरला! अजितदादांच्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या(time) तोंडावरही अजित पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. काहीच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 15 ते 20 नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.
अजित पवारांचा बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा(time) बालेकिल्ला होता. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. पक्षात फूट पडल्यानंतर शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत गेले. तर शरद पवार यांच्यासोबत केवळ दोन माजी नगरसेवक राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. आता शरद पवार गटात इनकमिंग सुरू झाली आहे. अशातच आज आझम पानसरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवारांसोबतची भेट:
शरद पवार यांच्यासोबतच्या आजच्या भेटीत पानसरे यांनी शहरातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. तसंच 20 जुलै रोजी शरद पवार यांच्या पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. या मेळाव्यातच 16 माजी नगरसेवकांसह आझम पानसरे हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. आझम पानसरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अजित पवार गटाने धसका घेतला आहे.
आझम पानसरे यांचा राजकीय प्रवास:
दरम्यान, आझम पानसरे हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील मोठे नाव आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात पानसरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पानसरेंचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे.
आझम पानसरे यांच्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार गटासाठी हा एक मोठा पाठिंबा ठरणार आहे.
हेही वाचा :
हार्दिक पांड्याच्या स्वागतालाही न आलेल्या पत्नी नताशाने शेअर केली पोस्ट
पैसे ठेवा तयार! लवकरच येणार ‘या’ दमदार कंपनीचा आयपीओ