ठरलं! पुढील 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

राज्यात विधानसभा(assembly) निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान आता पुढीaल तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात संकेत दिल्याची माहिती मिळतेय.

मागील पावणेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. त्या याचिकांवरील सुनावणीची सर्वांना प्रतिक्षा आहे. येत्या 4 जानेवारी रोजी या याचिकांवर सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे, तर आगामी तीन महिन्यांतच या निवडणुका घेण्याचे प्रयत्न असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय.

राज्याच्या विधानसभा(assembly) निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणक्यात विजय झाला. त्यानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नागपुरमध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘मन की बात’ मांडली. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपसाठी फेव्हरेबल वातावरण आहे. याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होईल, असं नियोजन पक्षाकडून करण्यात आलंय.

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच नागपुरात या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नवनियुक्त मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन नागपुरमध्ये होतं. विधानसभेतील विजयामुळे सरकार, लोकप्रतिनिधी आणि पक्षावरील जबाबदारी वाढली आहे. त्यामुळं सर्वांनीच जबाबदारीने वागणे अपेक्षित असून सरकार आणि जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा, असं फडणवीस म्हणाले. तिघांमध्ये योग्य समन्वय असल्यास काय होऊ शकते हे विधानसभेतील निकालांतून समोर आलं असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक बूथवर दीडशे नोंदणीचे ‘टार्गेट’ असायला पाहिजे. राज्यामध्ये दीड कोटी सदस्यता नोंदणी व्हायला हवी, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिलाय. रोजी सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते 5 जानेवारी जनतेत गेले तर 50 जणांची नोंदणी होवू शकते. काही तासांमध्येच 50 लाखांचा सदस्यांचा टप्पा गाठला जावू शकतो, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपची तयारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील तीन महिन्यांत होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा :

‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!

8 वेळा पलटी होऊन जमीनदोस्त झाली कार…अपघाताचा Video Viral

उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारवरच वैतागले…; म्हणाले,”अरे गप्प बसा ना बाबा”