जडेजानेही जाहीर केली T20 क्रिकेटमधून निवृत्ती,

रवींद्र जडेजाने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची बातमी क्रिकेट(cricket) चाहत्यांसाठी मोठी आहे. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. जडेजाने लिहिले आहे की, “माझ्या मनापासून, मी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांना अलविदा म्हणतो. मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिले आहे आणि इतर फॉरमॅटमध्येही असेच करत राहीन. T20 विश्वचषक जिंकून माझ्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे एक स्वप्न पूर्ण झाले, आठवणी, उत्साह आणि अतुलनीय पाठिंबा यासाठी धन्यवाद.”

रवींद्र जडेजाने २००९ मध्ये भारताकडून T20 क्रिकेटमध्‍ये पदार्पण केले होते. या फॉरमॅटमध्ये त्‍याने एकूण ७४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्‍याने १२७.१६ च्या स्ट्राइक रेटने ५१५ धावा केल्या आणि ५४ बळी घेतले. २००९ ते २०२४ या कालावधीत T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. विश्‍वचषक स्‍पर्धांमध्‍ये त्‍याने एकूण ३० सामने खेळले, ज्यामध्ये त्‍याने १३० धावा केल्या आणि २२ बळी घेतले.

यंदाच्‍या T20 विश्वचषक 2024 मध्ये रवींद्र जडेजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत त्याने एकूण आठ सामने खेळले आणि केवळ ३५ धावा केल्या, तसेच केवळ एक विकेट मिळाली.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून ११ वर्षांच्या ICC ट्रॉफीच्या दुष्काळाला संपवले आहे, आणि या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या भविष्यातील योजनांवर प्रभाव पडू शकतो, परंतु नवीन खेळाडूंना संधी मिळेल.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या संदर्भात महावितरणला दिलासा,

केळवली धबधब्यात दुर्घटना : तरुणाचा जीव गेला

अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात हाणामारी, पाच जण जखमी