भाजपला धक्का देत विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सात राज्यांमधील १३ जागांसाठी पोटनिवडणूक(assembly) पार पडली यांपैकी १० जागांवर इंडिया आघाडीनं विजय मिळवला आहे. तर केवळ एकच जागा भाजपनं जिंकली आहे. तर इतर दोन जागा अपक्षांनी राखल्या. यामुळं इंडिया आघाडीला पुन्हा लोकांनी बळ दिल्याचं बोललं जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये ४, हिमाचल प्रदेशात ३, उत्तराखंडमध्ये २, बिहार १, मध्य प्रदेश १, पंजाब १ आणि तामिळनाडूत १ या राज्यांमध्ये १० जुलै रोजी पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. तर आज या निवडणुकांचा(assembly) निकाल जाहीर झाला. यामध्ये १३ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात होते. यांपैकी १० जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत.
यामध्ये पश्चिम बंगालमधील सर्व चार जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत. हिमाचलमधील तीन पैकी दोन जागा काँग्रेसनं तर एक जागा भाजपनं जिंकली आहे. तसंच उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. बिहारमधील १ जागा अपक्ष, पंजाबमधील १ जागा आप, मध्य प्रदेशातील १ जागा भाजप आणि तामिळनाडूतील १ जागा डीएमके या पक्षांनी जिंकल्या आहेत.
हेही वाचा :
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची शक्यता
खुशखबर! EPFO खातेधारकांना लवकरच मिळणार व्याज, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
लाखो रिक्षा टॅक्सी चालकांचे विलंब शुल्क माफ! मुख्यमंत्र्यांचा निर्णय