जयंत पाटील लवकरच शरद पवारांची साथ सोडणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील (claimed)काही नेते संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात येणार असल्याचं मोठं विधान अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशासह राज्यातील अनेक राजकीय समीकरणं बदलणार असल्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्रात शिवसेने-राष्ट्रवादीच्या फुटीपासून कधी कोणता आमदार कोणत्या गटात जाईल हे सांगण कठीण झालं आहे. त्यामुळे कधी एकनाथ शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे आमदार-खासदार(claimed) संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतो. तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील काही नेते संपर्कात असल्याचा दावा केला जातो.

राज्यात महायुतीला लोकसभेत मिळालेलं अपयश पाहता शिंदे गटातील आणि अजित पवार गटातील आमदार शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चां सुरु आहेत. अशातच गडचिरोली जिल्ह्यातील अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु होत्या. मात्र या चर्चांना खुद्द मंत्री आत्रम यांनी पूर्णविराम दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर बोलावलेल्या बैठकीत धर्माराबाबा(claimed) आत्राम सहभागी झाले नव्हते. त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता स्वतः धर्मरावबाबा आत्राम यांनी आपण अजित पवार यांच्या सोबतच राहणार असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत या गटात येणार असल्याचं मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा :

‘या’ भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मोदी सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?

अजितदादांचा फैसला काय; NDA मध्ये राहणार की काकांच्या गोटात जाणार?