Jioचा 599 रुपयांचा जबरदस्त प्लॅन! डेटा, कॉलिंग आणि OTT फ्री
Reliance Jio कडे तुमच्यासाठी एक असा स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे जो(reliance jio) कमी किमतीत केवळ डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत नाही तर OTT चा देखील लाभ देतो. आम्ही Jio च्या 599 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. या प्लॅनसह तुम्हाला किती डेटा मिळेल आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मचा विनामूल्य प्रवेश दिला जाईल? चला सविस्तर जाणून घेऊया.Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी रिलायन्स जिओकडे 599 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन खास आहे, कारण कमी किमतीत या प्लॅनसह अनेक फायदे दिले जातात.
Reliance Jio l Jio 599 प्लॅनचे तपशील :
599 रुपयांच्या या रिलायन्स जिओ प्लॅनसह 1000 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो, हा प्लॅन 30Mbps च्या वेगाने येतो. डेटाव्यतिरिक्त, हा प्लॅन एअरफायबर वापरकर्त्यांना विनामूल्य अमर्यादित कॉलिंग आणि 800 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल देतो. कंपनीकडून 1000 रुपयांचा विनामूल्य इन्स्टॉलेशनचा (reliance jio) फायदा दिला जात आहे आणि ही माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या जिओ एअरफायबर प्लॅनसह Disney Plus Hotstar, Sony Liv, ZEE5, JioCinema Premium, Sun NXT, Hoichoi, डिस्कव्हरी प्लस, ऑल्ट बालाजी, इरोज नाऊ, लायन्सगेट प्ले आणि ShemarooMe यासह अनेक इतर OTT अॅप्सचा लाभ दिला जातो.
Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन :
एअरटेलच्या 599 रुपयांच्या एक्सस्ट्रीम फायबर प्लॅनमध्ये 30Mbps पर्यंतचा वेग, 350 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल तसेच Disney+ Hotstar सह 20 हून अधिक OTT अॅप्सचा लाभ दिला जातो.
एअरटेल प्लॅनचे तपशील :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा प्लॅन FUP मर्यादेसह 3300 GB डेटा सुविधा देतो. लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे एअरटेल प्लॅनसह कॉलिंग लाभ दिला जात नाही. नवीन कनेक्शन (reliance jio) घेताना जर तुम्ही 6 किंवा 12 महिन्यांचा प्लॅन निवडला तर इन्स्टॉलेशन शुल्क आकारले जाणार नाही, परंतु जर तुम्ही मासिक प्लॅन निवडला तर तुम्हाला 1500 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क द्यावे लागेल.
हेही वाचा :
भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी
महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ
ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव