नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेतील भरती 2024
भारतीय वायुसेना (इंडियन एअरफोर्स) विविध एअरफोर्स स्टेशन्स आणि युनिट्समध्ये ग्रुप-सी सिव्हीलियन पदांसाठी भरती करत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील तपशीलानुसार अर्ज करावा:(Indian Air Force)
मुख्यालय ट्रेनिंग कमांड, बेंगळूरु:
- पदसंख्या: 39
- पद: LDC (33), हिंदी टायपिस्ट (4), CMTD (2)
मुख्यालय मेंटेनन्स कमांड, नागपूर:
- पदसंख्या: 43
- पद: LDC (38), हिंदी टायपिस्ट (3), CMTD (2)
मुख्यालय सेंट्रल एअर कमांड, आग्रा:
- पदसंख्या: 8
- पद: LDC (6), हिंदी टायपिस्ट (2)
मुख्यालय ईस्टर्न एअर कमांड, वेस्ट बेंगाल:
- पदसंख्या: 21
- पद: LDC (19), हिंदी टायपिस्ट (2)
एअरफोर्स सेंट्रल अकाऊंट ऑफिस, नवी दिल्ली:
- पदसंख्या: 24 (LDC)
एअरफोर्स स्टेशन रेसकोर्स, नवी दिल्ली:
- पदसंख्या: 8 (LDC (7), हिंदी टायपिस्ट (1))
पात्रता:
- LDC आणि हिंदी टायपिस्टसाठी: 12 वी उत्तीर्ण, इंग्लिश टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- CMTD: 10 वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना, मोटर वाहन चालविण्याचे कौशल्य आणि 2 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (सवलतीसाठी शासकीय नियम लागू).
वेतन श्रेणी: रु. 21,700/- (पे-लेव्हल 2).
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा: जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल अॅप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, आणि संबंधित पदासाठी ट्रेड प्रश्न.
- स्किल/फिजिकल/प्रॅक्टिकल टेस्ट: फक्त पात्रता स्वरूपाची.
अर्ज प्रक्रिया:
अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 3 ऑगस्ट 2024 च्या अंकात उपलब्ध आहे. अर्ज विहीत नमुन्यातील असावा. अर्ज 1 सप्टेंबर 2024 पूर्वी संबंधित एअरफोर्स स्टेशनवर पोहोचावा.
हेही वाचा:
धनंजय पवारच्या कुटुंबाचा बिग बॉसला थेट सवाल: “आमचा धनंजय कुठे गायब आहे?”
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ तारखेला पाकिस्तानशी सामना