करणवीरने शिल्पा शिरोडकरला केलं किस; अभिनेत्याचं कृत्य पाहून चुमच्या चेहऱ्याचा बेरंग, Video व्हायरल

मुंबई – सलमान खानचा(Entertainment news) बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉसचा १८ वा सीझन नुकताच संपला. करणवीर मेहरा या सीझनचा विजेता ठरला आहे. बिग बॉस १८ दरम्यान, करण, चुम आणि शिल्पा यांनी त्यांच्या मैत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. शोमध्ये चुम आणि करणमधील बंध पाहून लोक असा अंदाज लावू लागले की ते रिलेशनशिपमध्ये आहेत.

शोमधून बाहेर पडल्यानंतरही, चुम आणि करण डेट करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. या सगळ्यात, अलीकडेच करण, शिल्पा, चुम आणि दिग्विजय राठी पुन्हा एकत्र आले. यादरम्यान, करणच्या(Entertainment news) एका कृतीमुळे चुमची चिडचिड झाल्याचं दिसून आले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा याचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो शिल्पा शिरोडकर, चुम आणि दिग्विजय राठी यांच्याशी जवळीक साधल्यानंतर त्यांना निरोप देताना दिसत आहे. क्लिपमध्ये करण आणि शिल्पा एकमेकांच्या गालावर किस करताना हसताना दिसत आहेत. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतले ते म्हणजे चुम दरंगच्या प्रतिक्रियेने.

करणने शिल्पाच्या गालावर किस केल्याचं पाहून चुम अस्वस्थ दिसत होती. यादरम्यान, ती करणसोबत थोडीशी वाद घालतानाही दिसली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण वीरच्या किसमुळे शिल्पा नाराज असल्याचा दावाही नेटिझन्स करत आहेत. म्हणूनच करण पुन्हा चुमला मिठी मारताना दिसला. पण चुमने अभिनेत्याला दूर ढकललं.

बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीनंतर, न्यूज१८ शोशाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, चुमला विचारण्यात आलं की तिचं करणवीर मेहरासोबत रिलेशनशिप आहे का? या प्रश्नावर उत्तर देत चुम म्हणाली होती, “ही मैत्री अशीच सुरू राहील. ‘आम्ही फक्त घरात मैत्री केली नाही, ही मैत्री घराबाहेरही सुरू राहील तिचं आणि करणचं रिलेशनशिप आहे का? असं विचारलं असता, चुम हसली आणि म्हणाली, ‘मला ते माहित नाही.’

हेही वाचा :

खुशखबर! BSNL ने आणला 12 महिने फ्री कॉलिंगवाला ‘हा’ रिचार्ज प्लॅन

रुग्णांना सर्वात मोठा दिलासा, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मंत्रालयातील हेलपाटे वाचणार

प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral