27 वर्षांनंतर करिष्मा-माधुरीमध्ये रंगली डान्सची जुगलबंदी

सिनेमांच्या गाण्यांमध्ये आजवर अनेक कलाकारांच्या जुगलबंदी(social media) सगळ्यांच्या लक्षात राहिल्या आहेत. आजही एक डान्सची जुगलबंदी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते आणि ही जुगलबंदी आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूरमधील.

दिल तो पागल है या सिनेमात त्या एका गाण्यात(social media) या दोघींमध्ये ही जुगलबंदी पाहायला मिळाली. त्या काळात ही जुगलबंदी खूप गाजली होती आणि आता पुन्हा एकदा या अभिनेत्रींनी एका रिअॅलिटी शोच्या मंचावर पुन्हा एकदा हा गाजलेला परफॉर्मन्स सादर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप गाजला आहे.

‘दिल तो पागल है’ या सिनेमात करिश्माने निशा तर माधुरीने पूजा या भूमिका साकारल्या होती. एका नाटकाच्या ग्रुपमध्ये लीड डान्सर असलेल्या निशाचा पाय दुखावला जातो आणि त्यामुळे पूजा त्या ग्रुपची लीड डान्सर बनते. पुढे शाहरुख आणि तिची लव्हस्टोरी कशी फुलत जाते हे या सिनेमात पाहायला मिळालं. याच सिनेमातील एका सीनमध्ये त्या दोघींमध्ये डान्सची जुगलबंदी रंगते असं पाहायला मिळालं. हा सीन चांगलाच गाजला होता आणि आता तब्बल २७ वर्षांनी माधुरी आणि करिष्माने हा सीन कलर्स टीव्हीवरील डान्स दिवाने या रिअॅलिटी शोमध्ये पुन्हा सादर केला.

यावेळी माधुरीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता तर करिश्माने काळ्या रंगाचा भरजरी ड्रेस घातला होता. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर उपस्थित परीक्षक सुद्धा या डान्सने भारावून गेले. सोशल मीडियावर अनेकांनी ह्या व्हिडिओवर कमेंट करत या दोघींच्या डान्स स्किल्सचं कौतुक केलं. त्यांच्या या डान्सला परीक्षक सुनील शेट्टीने “तभी भी आपके लिए दिल पागल था और आज भी आपके लिए दिल पागल है” असं म्हणत त्यांचं कौतुक केलं.

१९९७ साली आलेल्या या सिनेमात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिष्मा कपूर आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका होती. यश चोप्रा यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. हा सिनेमा त्या काळी सुपरहिट झाला होता.

हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीचा एसटीला फटका; एका सहीमुळं सगळं रखडलं…

कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का?