कार्तिक आर्यन 11 वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या डेटिंग लाइफमुळे (dating)चर्चेत आहे. यावेळी त्याच्या आईनेच मोठी हिंट दिली आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात त्याच्या आई माला तिवारी यांनी सूचक विधान केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे की कार्तिक एका ११ वर्षांनी लहान प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे.

जयपूरमध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात कार्तिक आर्यन सूत्रसंचालन करत होता. यावेळी प्रेक्षकांमध्ये त्याची आई माला तिवारी देखील उपस्थित होत्या. एका व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांना कार्तिकच्या होणाऱ्या सुनेबाबत विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, “आमच्या कुटुंबाची डिमांड एक चांगल्या डॉक्टरसाठी आहे.”या वक्तव्यावरूनच चाहत्यांनी अंदाज लावला की कार्तिक (dating)आर्यन अभिनेत्री श्रीलीला हिला डेट करत आहे. कारण श्रीलीला अभिनयासोबतच डॉक्टर होण्याचं शिक्षण घेत आहे. अद्याप कार्तिक किंवा श्रीलीलाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
कार्तिकच्या सेलिब्रेशनमध्ये श्रीलीलाची उपस्थिती! :
काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या कुटुंबीयांच्या खास सेलिब्रेशनमध्ये श्रीलीला सहभागी झाली होती. हे सेलिब्रेशन त्याची बहीण आणि डॉक्टर कृतिका तिवारी हिने आयोजित केले होते. त्या व्हिडीओंमध्ये श्रीलीला कार्तिकच्या कुटुंबीयांसोबत धमाल करताना दिसली होती. त्यामुळे चाहत्यांनी या दोघांच्या रिलेशनशिपबाबत अधिक (dating)अंदाज बांधायला सुरुवात केली.
कार्तिक आणि श्रीलीला लवकरच एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून, त्याचे अधिकृत नाव अद्याप जाहीर झालेले नाही. श्रीलीला ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री असून, ती ‘पुष्पा 2’ च्या आयटम साँगमध्ये देखील झळकली आहे. तिचे वय 23 वर्षे आहे आणि तिने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.
हेही वाचा :
UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज!
अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्यविक्रेत्यांचे टेन्शन!
आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी