केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका: प्रशासन सतर्क
कोल्हापूर: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला(theater) लागलेल्या भीषण आगीमुळे कोल्हापूर शहरातील कलाप्रेमींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी नाट्यगृहाच्या पुनरउभारणीसाठी मदतीची तयारी दर्शवली आहे.
मात्र, या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे प्रशासनाने शंभर मीटरच्या परिसरात सामान्य लोकांना येण्यास मज्जाव करणारा आदेश जारी केला आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील हालचालीवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. करवीर प्रांताधिकारी यांनी नाट्यगृहाच्या आसपास लोखंडी कठिले लावण्याचे आदेश दिले आहेत, तर पोलीस अधीक्षकांना पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेने कोल्हापूरकरांना अतिवदुःख झाले असून, समाज माध्यमांवर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशाळगड अतिक्रमण आंदोलनावेळी पुरेसा बंदोबस्त ठेवला नसल्याने झालेल्या हिंसक घटनांची आठवण करून, प्रशासनाची तत्परता आता अधिक ठळकपणे जाणवू लागली आहे. उच्च न्यायालयानेही त्या वेळच्या घटनांवर ताशेरे ओढले होते, त्यामुळे आता प्रशासनाने अधिक सतर्कता दाखवण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा:
नोकरी बाजारात तेजी; जुलैमध्ये मागणीत 12 टक्क्यांची विक्रमी वाढ
अबू सालेमची नवी ‘कर्मभूमी’ नशिक कारागृह; सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर
रुग्णालयात हलगर्जीपणाचा बळी कर्मचारी; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप