सरकारी कार्यालयात घुसून भरदिवसा तलाठ्याची हत्या; डोळ्यात मिरचीपूड फेकून केला चाकूहल्ला
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना(government id) दिसत आहे. त्यात भरदिवसा हल्ला होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे पाहिला मिळत असतानाच हिंगोलीत सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूहल्ला करून खून केला.
संतोष पवार (वय ३६) असे हत्या झालेल्या तलाठीचे (government id) नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगावमध्ये ही घटना घडली. येथील तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूहल्ला केला.
शेतीचा फेरफार प्रलंबित असल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यात गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचा परभणीकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथे दुपारी एकच्या सुमारास तलाठी पवार हे सज्जा कार्यालयात काम करत बसले होते. येथे बोरी सांवत येथील एकजण त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आले होते. तलाठी व त्यांच्यात बाचाबाची झाली.
तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्यावर धारधार चाकूने वार केले. तलाठी कार्यालयात काय प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाठी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलविण्यात येत होते. परंतु, त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
हेही वाचा:
शिंदे सरकारचं वाढणार टेन्शन, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीला मंजूरी, 10 लाख लोकांना मिळणार रोजगार
विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला…