पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथील स्मशानभूमीत अनेक वेळा ”अघोरी प्रकार” केले जात आहेत.(performed )लिंबू, तांत्रिक साहित्य आणि विचित्र पूजा साहित्य आढळून येत होते. या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे कार्यकर्त्यांनी या अंधश्रद्धेला चोख प्रत्युत्तर दिले.मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत आढळलेले लिंबू उचलून त्यापासून थेट सरबत तयार करून पिले. या उतरवून टाकलेल्या लिंबूमुळे काहीही होत नाही, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यांनी या कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत जनतेमध्ये जागृती निर्माण केली.
जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे पट्टणकोडोली स्मशानभूमीत घटना घडली. (performed )पुन्हा प्रकार घडल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर मनसेने केलेल्या कार्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा करून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली.ग्रामपंचायत सदस्य, मनसे अध्यक्ष रवींद्र आडके म्हणाले की, पट्टणकोडोली गावातील स्मशानभूमीत यापूर्वी अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत. याबाबत आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अशा प्रकारच्या अघोरी कृत्यांमुळे भीती घालून काही लोक समाजात गैरसमज पसरवतात. पण विज्ञानाच्या आधारे विचार केल्यास हे खोटे आहे. असे आडके म्हणाले.
पट्टणकोडोली गावाबाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत मध्यरात्री भोंदूबाबा, मांत्रिक येऊन असे प्रकार करतात. (performed )गावापासून लांब असलेल्या स्मशानभूमीत असे प्रकार होत असल्याने गावकर्यांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणाविरोधी कायद्यालासमोरच आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा :