‘शक्तिपीठ’ महामार्गावरुन कोल्हापूर तापलं, CM शिंदेंनी दौऱ्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नागपूर ते गोवा ‘शक्तीपीठ’महामार्गाला(highway) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मोर्चा, आंदोलनं अशा जमेल त्या माध्यमांतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरचा दौरा करणार होते.
मात्र, त्यांच्या दौर्यादिवशीच (highway)कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती.त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला कोल्हापूर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हद्दवाढ,सर्किट बेंचसह आधीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच शिंदेंना मोर्चाद्वारे जाब विचारण्याचा इशाराही देण्यात आला होता.त्यामुळे कोल्हापुरात वाद चिघळण्याची शक्यता होती. पण आता मुख्यमंत्री शिंदेंनी आपला कोल्हापूर दौरा रद्द केला होता.
CM एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता.25) कोल्हापुरला येणार होते. मात्र, त्यांनी विविध स्थानिक संघटनांचा विरोध पाहून कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. शिंदे हे मंगळवारी कोल्हापूर शाश्वत विकास परिषदेसाठी येणार होते. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना शिंदेंनी तो रद्द न करता या मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्याचे म्हटले होते. त्यामुळे कोल्हापूरात शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतून शिंदेंविरोधात वातावरण तयार झाले होते.
केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होतील,अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. कोकणात जाण्यासाठी अनेक मार्ग असताना केंद्र सरकारला आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी आहे,असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शाश्वत विकास परिषदेसाठी थेट कोल्हापूर गाठणे टाळलं असून त्यामागे कोणताही राजकीय वाद निर्माण होऊ नये हा उद्देश असल्याचे बोलले जात आहेत. ते आता शाश्वत परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा :
टीम इंडियाकडून खेळलेला महाराष्ट्राचा क्रिकेटपटू उतरणार राजकारणात
महाराष्ट्र हादरलं! ३ तरुणांसह महिलेचं अपहरण करून बेदम मारहाण Video Viral
मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला, आंदोलकांनी तोंडाला फासलं काळं Video
मी चौथीत असताना बिड्या प्यायचो चक्कर येऊन पडायचो माजी मंत्रीचा VIDEO