Kolhapur:तू माझी मैत्रीण आहेस काही अडचण आली तर फोन कर जबाब घेण्याऱ्या पोलिसाचा प्रताप छातीला स्पर्श करून

कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये पोलीस पेशाला (place)काळीमा फासणारी घटना घडली आहे. रूग्णालयात जबाब घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले आहे. मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

शाहूपुरीतील एका तरूणीने हातापायाला कापून घेतले होते. त्यानंतर तिला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरूणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तरूणीचा जबाब नोंदवण्यासाठी अतिदक्षता विभागात पोलीस चेतन घाटगे पोहोचला. त्याने (place)रात्री ८:३० च्या दरम्यान तरूणीचा जबाब नोंदवून घेतला.

तरूणीचा जबाब नोंदवून झाल्यानंतर पोलिसाने तिला आपला मोबाईल क्रमांक दिला. “तू माझी मैत्रीण आहेस. घाबरू नकोस. काही अडचण आली तर, मला फोन कर”, असे सांगत त्याने मुलीच्या शरीराच्या ठिकठिकाणी स्पर्श केला. तसेच छातीलाही स्पर्श केला.

या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला दिली. पीडित मुलीने थेट पोलीस नाईक चेतन घाटगे विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची माहिती (place) मिळाल्यानंतर पोलीस विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस नाईकविरोधात रोष व्यक्त केला.

हेही वाचा :

भारताच्या शत्रू देशाबाबत बाबा वेंगा यांचं सर्वात मोठं भाकीत समोर

Sikandar ला सपोर्ट मिळत नसल्याने सलमान खान भावूक, म्हणाला

शेतकऱ्यांना गुडन्यूज! शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ; सरकारचा निर्णय