मतमोजणीदिवशी कोल्हापुरातील ‘हे’ मार्ग राहणार बंद; वाहतूक मार्गात बदल
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार आहे.(changes) कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा गोदामात होणार आहे. यासाठी या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
मंगळवारी (ता. ४) पहाटे पाच वाजल्यापासून हे बदल लागू होणार आहेत. सीपीआर चौक ते कसबा बावडाकडे जाणारे सर्व वाहनांना महावीर कॉलेज चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहनांनी पाटलाचा वाडा, कलेक्टर ऑफिस चौकमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे. पितळी गणपती चौक ते एस.पी. ऑफिस चौक जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पितळी गणपती या ठिकाणी प्रवेश बंद आहे. वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, सर्किट हाऊसमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
कसबा बावड्याकडून पोस्ट ऑफिसमार्गे सीपीआरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (changes)चार क्रमांक फाटक येथे प्रवेश बंद आहे. या वाहनांनी लाईन बाजार चौक, सर्किट हाऊसमार्गे पुढे मार्गस्थ व्हावे. रमणमळ्यातून येऊन ड्रिमवर्ल्डच्या पाठीमागील रस्त्याने धोबी कट्टापर्यंत ये-जा करण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडे जाण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोदामकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद आहे.
नागरिकांना सूचना
रमणमळा परिसरातील स्थानिक रहिवाशांनी येण्या-जाण्यासाठी शंभर फुटी रोडचा वापर करावा. रमणमळा, १०० ठाण, जावडेकर सोसायटी, तसेच छत्रपती शाहू हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या-जाण्यासाठी पोलो ग्राऊंड, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या मार्गाचा वापर करावा.
हातकणंगले मतमोजणी पार्किंग व्यवस्था
- मतमोजणीसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या वाहनांसाठी (changes)पार्किंग मतमोजणी ठिकाणच्या समोरील रिकाम्या जागेमधे (रस्त्याच्या पलीकडे) करण्यात आली आहे.
- निवडणूक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहने युको बँकशेजारील रिकाम्या जागेवर उभी करावीत. शिवाजी विद्यापीठ नवीन म्युझियम इमारत शेजारील मोकळी जागा. एच. पी. गॅस गोदामासमोरील रिकाम्या जागेवरही वाहनतळ व्यवस्था करण्यात येत आहे.
सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ रस्ता बंद
सरनोबतवाडीकडून राजाराम तलावमार्गे छत्रपती शिवाजी विद्यापीठकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सरनोबतवाडी अंडरब्रीज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी उजळाईवाडी अंडरब्रीज, शाहू टोल नाकामार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे. (सरनोबतवाडी गावचे रहिवासी यांची वाहने वगळून) हायवे कॅन्टीन चौक, सरनोबतवाडी नाका, राजाराम तलावमार्गे हायवेला जाणाऱ्या सर्व वाहनांना सरनोबतवाडी टी पॉईंट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी शाहू टोल नाकामार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
नागरिकांना सूचना
रमणमळा परिसरातील स्थानिक रहिवाशांनी येण्या-जाण्यासाठी शंभर फुटी रोडचा वापर करावा. रमणमळा, १०० ठाण, जावडेकर सोसायटी, तसेच छत्रपती शाहू हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या-जाण्यासाठी पोलो ग्राऊंड, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या मार्गाचा वापर करावा.
हेही वाचा :
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
इचलकरंजी येथील आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी आलेल्या ट्रकची कागदपत्रं बनावट
शुबमन गिल डिसेंबर महिन्यात अडकणार विवाहबंधनात…
आघाडीचा पंतप्रधान कोण संजय राऊत यांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव