कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची तोडफोड केली अन्…

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, लोहगावनंतर आता धनकवडीत कोयतेधारी (gang)टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडत असून, यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडले जात आहेत.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (gang)टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रकरणात साहिल दुधाणेला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाणचा वाद झाला होता. त्याचा राग दुधाणे याच्या मनात होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला.

मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार कारच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी कारमधून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली.

एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

हेही वाचा :

इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं

“५ वर्षांनंतरचा सावट: रहस्यमयी व्हायरस पसरतोय, लॉकडाऊनची शक्यता”

सर्वोच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये निवड प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेला घेण्यात येणार टायपिंग टेस्ट